Sunday, March 17, 2019



अॅबाकस (जपानी भाषेत सोरोबन)
अॅबाकस ला मराठी मध्ये "सरकणार्या मण्यांच्या दांड्या असलेली आणि मोजण्यासाठी किंवा आकडेमोडीसाठी वापरण्यात येणारी चौकट" असे म्हणतात.
पूर्वीच्या काळी आकडेमोड करण्यासाठी आजच्या सारखे इलेक्ट्रोनिक कॅल्कूलेटर नव्हते. मग एखाद्या धातूच्या किंवा लाकडाच्या चौकटीमध्ये आडवे उभे मणी लावून आकडे मोड केली जायची. याच उपकरणाला अॅबाकस म्हणतात. प्रत्येक देश्या प्रमाणे त्या अॅबाकस ला वेगवेगळी नावे आहेत आणि अॅबाकस वापरण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पण आहेत. उदाहरणार्थ चीन मध्ये अॅबाकस ला सुआनपान म्हणतात तर जपान मध्ये सोरोबन. भारता मध्ये नावच नाही. सगळे अॅबाकसच म्हणतात. मी लहान असताना वडिलांनी एक खापराची पाटी आणून दिली होती. त्याच्या एका बाजूला रंगबेरंगी मणी होते. त्याला आम्ही "मण्यांची पाटी" म्हणायचो. आज जाऊन कळले कि, ते पण एकप्रकारचे अॅबाकस होते.
अॅबाकस चा शोध जरी चीन मध्ये लागला असला तरी जपान ने अॅबाकस ला वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवले. आज जगभरात जपानचाच सोरोबन शिकवला किंवा वापरला जातो. सोरोबन नि सजवलेली दुकाने आजही आपल्याला जपान मध्ये पहावयास मिळतील. तिथे लहानपणा पासूनच मुलांना सोरोबन शिकवले जाते. सोरोबन च्या स्पर्धा पण भरवल्या जातात.
अॅबाकस चे फायदे :
) माणूस अंकगणितात हुशार होतो.
) स्मृती आणि एकाग्रता शक्ती वाढते.
) आत्मविश्वास वाढतो.
) काल्पनिक आणि व्हिज्युअलायझेशन शक्तीचा विकास होतो.
) लॉजिकल आणि विश्लेषणात्मक विचार शक्ती वाढते.
अॅबाकस शिकवण्याचे टप्पे :
तसे पाहायला गेले तर आपल्याकडे अॅबाकस क्लासेस मध्ये टप्याच्या बाबतीत विविधता आढळते. काही क्लासेस मध्ये सहा टप्पे तर काही क्लासेस मध्ये आठ तर काही मध्ये दहा टप्यामध्ये अॅबाकस शिकवतात. पण अॅबाकसचे मुख्यत्वे तीन प्रकार पडतात.
पहिला टप्पा:
यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार शिकवतात. त्यात परत एक अंकी संख्येपासून दहा ते बारा अंकी संखे पर्यंत सोडवणे ते पण कमीत कमी वेळात सोडवायचा प्रयत्न करणे. (सोरोबन वापरून)
दुसरा टप्पा:
यामध्ये वर्ग करणे, वर्गमूळ काढणे तसेच दशांस मध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार करणे. इथे पण एक अंकी संख्येपासून दहा ते बारा अंकी संखे पर्यंत सोडवणे ते पण कमीत कमी वेळात सोडवायचा प्रयत्न करणे (सोरोबन वापरून)
तिसरा टप्पा:
हा टप्पा वरील दोन पेक्षा खूप अवघड असतो. इथे वरील सर्व गणिते सोरोबन वापरता सोडवायची असतात. सराव करून करून तुमच्या डोक्यामध्ये सोरोबन ची प्रतिमा तयार झालेली असते आणि स्मरण शक्तीचा पण विकास झालेला असतो. त्यामुळे सोरोबन वापरता तुम्ही आकडे मोड करू शकता. ज्यांनी तिसरा टप्पा पूर्ण केला आहे .